उस्मानाबाद /प्रतिनिधी-
शहरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने डाॅल्बीला फाटा देत अतिशय पारंपारिक पध्दतीने, आपल्या जपलेल्या संस्कृतीचा ठेवा सादर करत भव्य पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या मिरवणूकीचा उद्घाटन पद्मश्री मा.खा.डाॅ.विकास महात्मे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय हनुमान ग्रुपचे संस्थापक सुरेश कांबळे, बहुजन वंचित आघाडीचे राज्य समन्वयक अर्जुन सलगर, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारत डोलारे, भाजपा नेते गोविंद कोकाटे, दत्ता बंडगर, धनंजय शिंगाडे, सोमनाथ गुरव, मुकेश नायगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारंपारक ढोलपथक, वसार्‍या घेवून असणारे वारूवाले या सर्वांच्या सादरीकरणामुळे तर लोकांतील जयंतीचा उत्साह वाढतच गेला. पथकांनी केलेल्या सादरीकरणाला लोकांनीही भरभरुन दाद दिली, कौतुक केले. जयंतीला खुप गर्दी असूनही मिरवणूक शांततेत पार पडली.
मिरवणूकीच्या शेवटी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
 
Top