उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी जिल्हा उस्मानाबादच्या वतीने देशाचे माजी ग्रामविकास मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा भाजपा कार्यालयात स्व,गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्र.का.सदस्य अँड.खंडेराव चौरे,जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष प्रविण पाठक,जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, जिल्हा चिटणीस इंद्रजित देवकते, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अतिक पटेल,शहराध्यक्ष संदीप कोकाटे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल काकडे, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरऌचिटणीस शरीफ शेख,जीवन वाटवडे,संतोष आगलावे,अक्षय भालेराव,गोपी शेरखाने,गिरीश सूर्यवंशी,सुरेश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

 
Top