तालुक्यातील पारगाव येथे शिवसेनेच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर आजपासून सुरू करण्यात आले आहे. सध्या पारगाव येथे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे त्यामुळे गावातील नागरिक पिण्याचे पाणी विकत घेऊ लागले आहेत किंवा पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करत आहेत त्यामुळे शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपनेते शिवजल क्रांतीचे प्रणेते विकास रत्न आमदार माननीय प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडून स्वखर्चाने पारगाव येथील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे 12000 लिटर क्षमतेच्या टॅंकरने प्रत्येक दिवसाला दोन तीन चार अशा ट्रिप पारगाव येथे होणार आहेत त्यामुळे पारगाव येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे टँकर सुरू करतेवेळी विकास रत्न आमदार तानाजी राव सावंत साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती दत्ता मोहिते,शिवसेनेच्या वाशी पंचायत समिती सदस्य सौ. सविता तळेकर, पंचायत समिती सभापती लक्ष्मीकांत आटोळे, विकास तळेकर, लहूदास चव्हाण, बासूमिया तांबोळी, डॉ
आनंद कुलकर्णी, बंडू मुळे, सरमकुंडी चे सरपंच दिनकर शिंदे, बंडू खोसे, बाबा हारे, बाबासाहेब गावडे, महेश आखाडे, तानाजी कोकाटे, प्रदीप कोकणे,सुजित कोकणे, राजा कोळी, दत्ता मुळे,आयुब पठाण, शरद मोटे, मुकेश अवताने,
पदमशेठ नारटा, विलास कासार, सुरेश लाखे, सुशांत कोकणे, महेश कोकणे, रामदास खारतोडे, संतोष लाड, दशरथ नाळपे, आधी गावातील शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सर्व ग्रामस्थांच्यावतीने शिवसेनेचे उपनेते कार्यसम्राट विकास रत्न आमदार प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांचे जाहीर आभार शिवसेनेच्या वाशी पंचायत समिती सदस्य सौ सविता तळेकर यांनी गावकऱ्यांच्या वतीने मानले.
