उमरगा /प्रतिनिधी-
पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील  एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील ज्युनियर डॉक्टर्सवर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दि 14 रोजी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वतीने निषेध व्यक्त करत डॉक्टर्सनी काळ्या फिती लावून काम केले. यावेळी डाॅक्टरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेल पाठवून आपला निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्ष डाॅ. दिपा मोरे म्हणाल्या की, आरोग्यावर कामं करणार्या डॉक्टर वर जर असे हल्ले चालू राहिले तर भिती युक्त वातावरणात काम करणे अवघड होईल यामुळे भविष्यात वैद्यकीय आभ्यासक्रमा कडे जाण्याचा ओढा कमी होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात समाजाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.असे शेवटी सागितले. यावेळी डाॅ. सुभाष वाघमोडे, डाॅ. डि. एस. थिटे, डाॅ. उदयसिंह मोरे, डाॅ. विजय पाटील, डाॅ. दिपक पोफळे, डाॅ. एन. डी. बिराजदार, डाॅ. अभय शिंदे, डाॅ. नीलेश महामुनी, डाॅ. सिध्दराम ख्याडे, डाॅ. प्रसाद स्वामी, डॉ. सुचेता पोफळे, डाॅ. मनीषा शिंदे, डाॅ. शुभांगीनी महाजन आदीसह शहरातील सर्व डाॅक्टर सहभागी झाले होते. 
 
Top