उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सरकारी योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी जे प्रयत्न केले जात आहे. त्या प्रयत्नात शेतकरी वर्गाने मोठया संख्येने सहभागी व्हावे, शेती व वृक्षलागवडीसाठी पाणी हे महत्वाचे आहे. पाण्यामुळेच शेती व्यवसाय नुकसानीत आहे त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करने महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खा. ओमराजे निंबाळकर तुळजाभवानी खरीप हंगाम पुर्व कृषी महोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी केले.
नगर परिषद नाट्यगृह व यशराज लॉन्स, उस्मानाबाद येथे २ जून ते ५ जून पर्यंत खरीप हंगामपुर्व कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये कृषी संशोधन, कृषी औजारे, यंत्रे, वाहने, बचत गट स्टॉल आदी स्टॉल  उभारण्यात आले आहेत.  उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिपा मुधोल-मुंडे यांनी तुळजाभवानी खरीप हंगाम पुर्व कृषी महोत्सव हे पाहण्यासाठी नसून शेतक-यांनी त्याचा उपयोग आपल्या शेतात करावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. शेतक-यांना अनेक योजनांच्या माध्यमातून सरकार मदत करीत आहे. त्यामुळे शेतक-यांनी बहु पर्यायी पिके घ्यावीत. त्याचप्रमाणे फळबागाचे ही उत्पादन घ्यावे. भूम येथे अतिरिक्त दुधाचे उत्पादन होत आहे. त्या दुधासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मुधोल- मुंडे यांनी दिले.
या उद्घाटन कार्यक्रमानंतर डॉ.नवनाथ कस्पटे यांचे सिताफळ लागवड व  सिताफळ कशा प्रकारे उत्पादन देऊ शकते यावर सविस्तर मार्गदर्शन झाले.कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी पराग सोमन, अतिरिक्त सीईओ अनुप शिंगुलवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, आदी उपस्थित होते.
निमंत्रण पत्रिका नाही
हजारो रूपए खर्च करून कृषी महोत्सव घेण्यात येत आसला तरी अधिकारी वर्गांने बॅनर, कमानी, पडदे यावर मोठया प्रमाणवर खर्च केल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रसिध्दी माध्यमांना न मिळाल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता.निमंत्रण पत्रिका पत्रकारांच्या कांही व्हॉट्सअप ग्रुप टाकल्याची ही चर्चा होती.उस्मानाबाद शहरात कृषी महोत्सव संदर्भात लॉऊर्सपिकर फिरविण्यात आले.  तर ट्रॅक्टर, स्पिक्रल,रोटर, भरडायाची मशिन  आदी कंपनी स्टॉलला  भाडे आकारण्यात आल्याचे समजते. 
 
Top