उस्मानाबाद /प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासन मान्य संस्थाची संघटना मुंबई संलग्न उस्मानाबाद जिल्हा संगणक टंकलेखन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील तुळजाभवानी कॉम्प्युटर टाईपरायटींग इन्स्टिटयुटचे संचालक अॅड योगेश सोन्ने -पाटील यांची तर जिल्हाउपाध्यक्षपदी रूईभर येथील तेज टाईपरायटींग इन्स्टिटयुटचे संचालक रामदास कोळगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
  येथील ज्ञानोदय क्लासेसच्या सभागृहात रविवारी (दि.2) रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्था संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश कराळे, महासचिव हेमंत ढमढेरे, वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश पोरे, संघटनेचे राज्य समन्वय समिती सदस्य अॅड विठ्ठल बडे, संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पंकज पवार आदीची उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थिती म्हणुन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी गोरख्र सोन्ने-पाटील, जि.पचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री थिटे आदीची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या निवड प्रक्रियेत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश पोरे यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी अॅड योगेश सोन्ने-पाटील तर उपाध्यक्षपदासाठी रामदास कोळगे यांची नावे सुचविली. यावर उपस्थित टंकलेखन संस्थाचालकांनी अनुमोदन देवुन एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरच्या निवडी हया पाच वर्षासाठी असुन जिल्हाध्यक्षपदी तुळजाभवानी कॉम्प्युटर टाईपरायटींग इन्स्टिटयुटचे संचालक अॅड योगेश सोन्ने-पाटील यांची निवड केल्याबद्दल जिल्हयातील संस्थाचालक, निदेशक, प्राचार्य यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त होत आहेत. यावेळी निवड बैठकीस जिल्हयातील टंकलेखन संस्थचालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. सुत्रसंचालन दिनेश पोरे यांनी केले तर आभार आकाश मोरे यांनी मानले.
 
Top