उस्मानाबाद/प्रतिनिधी – 
उस्मानाबाद जिल्हा नियोजन कमिटीच्या बैठकीत १९३ कोटी रूपयाच्या योजनेमध्ये  ५४ कोटी वाढ करून २४७ कोटी रूपयाच्या नियोजनास मंजुरी मिळाली आहे. पहिल्यांदा उस्मानाबाद जिल्हयास योजनांमध्ये एवढया मोठया रक्कमेचे नियोजन केले गेले आहे , असी माहिती पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
उस्मानाबाद जिल्हा महिला शासकीय रुग्णालयासाठी तब्बल २० कोटी रुपयांचा तर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रलंबित कामासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली . युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयाबाबत बैठक घेऊन रुग्णाची गैरसोय दूर करण्याची सुचना केली होती त्यानुसार महिला रुग्णालयात अतिरिक्त १०० खाटासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णाची वैद्यकीय सोय होणार आहे . 
उस्मानाबाद महिला रुग्णालय ६५ खाटांचे असून येथे अनेक रुग्ण येत असल्याने महिला रुग्णांना अनेक वेळा जमिनीवर बेड टाकून उपचार घ्यावे लागत असे , ही गैरसोय आता थांबणार असून अतिरिक्त १०० खाटांना मान्यता मिळाली आहे . २० कोटी रुपयांतून महिला रुग्णालयाचे नूतनीकरण व विस्तार होणार असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे . जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रलंबित कामासाठी साडे चार कोटी रुपये जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून मंजूर करण्यात आले असून यातून रखडलेली कामे होणार असल्याचे पालकमंत्री खोतकर म्हणाले . यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर , शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर , जिल्हा प्रमुख कैलास पाटील ,तालुका प्रमुख सतीश सोमाणी, संजय पाटील दुधगावक उपस्थित होते . 
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी यावर्षी तब्बल ५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आला असून उस्मानाबाद हा राज्यातील एकमेव असा जिल्हा आहे ज्याला वाढीव निधी मंजूर झाला आहे . उस्मानाबाद जिल्ह्याला गेल्या वर्षी १९३ कोटी रुपये प्राप्त होते मात्र यावर्षी २४७ कोटी रुपये मंजूर झाला आहेत , त्यातील ८२ कोटी रुपये प्रशासनाला प्राप्त झाले आहेत . उस्मानाबाद जिल्हा स्टेडीयममधील क्रीडा संकुलात ऑलंपीक दर्जाचे टेनीस कोर्ट तयार करण्यात आले असून लवकरच या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कुस्तीसह इतर खेळाच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत . 
शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर आहे मात्र उस्मानाबाद जिल्हा बँकेत चलन तुटवड्याचे कारण सांगत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत . जिल्हा बँकेने अद्याप ४० कोटी शेतकऱ्यांना वाटप केले नसून या वाटपास झालेल्या दिरंगाईबाबत चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री खोतकर यांनी दिले आहेत . जिल्हा उप निबंधक पीक विमा वाटपाच्या दिरंगाईची चौकशी करून अहवाल सादर करतील . तसेच ज्या शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून फळबागा लावल्या होत्या मात्र दुष्काळात त्या करपून गेल्या आहेत . अश्या फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले . 
 
Top