उस्मानाबाद/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.गोविंद काळे यांची पदार्थविज्ञान विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून उस्मानाबाद उपपरिसर येथे हा विभाग नव्याने सुरु होत आहे.कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी सोमवारी (दि.तीन) यांनी सदर नियुक्ती केली आहे. उस्मानाबाद जिल्हाची शैक्षणिक निकट लक्षात घेता पदार्थविज्ञान, नाटयशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे चार विभाग २०१९-२० या शैक्षणिक वर्षांपासून सुरु करण्यात आले आहेत. यातील पदार्थविज्ञान विभागप्रमुखपदी डॉ.गोविंद काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते परीक्षा मंडळ, उस्मानाबाद उपपरिसर मंडळ पदावर कार्यरत आहेत. या नियुक्तीबदल डॉ.काळे यांचे प्रकुलगुरु डॉ.अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ.साधना पांडे, संचालक डॉ.मनार साळूंके, उपकुलसचिव आय.आर.मंझा आदींनी अभिनंदन केले आहे.