प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. कुलकर्णी यांचा 112 मतांनी पराभवउस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत अ‍ॅड. राघवेंद्र सुब्राव बोधले यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. अध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड. बोधले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार तथा ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी यांचा 112 मतांनी एकतर्फी पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. निलेश बारखडे-पाटील यांनी निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर बोधले समर्थक विधीज्ञ बांधवांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. 
जिल्हा विधीज्ञ मंडळाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. यंदा अध्यक्ष वगळता अन्य पदाधिकार्‍यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. मात्र अध्यक्षपदासाठी पाच जणांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. ऐनवेळी तिघांनी माघार घेतल्याने अ‍ॅड. राघवेंद्र बोधले व ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. दत्तात्रय कुलकर्णी यांच्यात लढत झाली. अध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 9 ते 4 या वेळेत एकूण 522 मतदारांपैकी 477 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 5 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. निलेश बारखडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रितीश उंबरे, अ‍ॅड. अमरसिंह जगताप यांनी मतमोजणी करून निवडणूक निकाल जाहीर केला. त्यानुसार अ‍ॅड. राघवेंद्र बोधले यांना 393, तर प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. दत्तात्रय कुलकर्णी यांना 181 मते मिळाली. तर नोटाला 3 मते पडली. अ‍ॅड. बोधले हे 112 मतांच्या फरकाने विजयी झाल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी जाहीर करताच अ‍ॅड. बोधले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. अ‍ॅड. बोधले यांच्या विजयानंतर अनेक ज्येष्ठ, कनिष्ठ विधिज्ञांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अ‍ॅड. राघवेंद्र बोधले यांनी, सर्व विधीज्ञांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थक ठरवत सर्वांना एकत्रित घेवून काम करणार असल्याची प्रतिक्रिया करून सर्व विधीज्ञांचे त्यांनी आभार व्यक्त केले. 
असे आहे नवे विधीज्ञ मंडळ
जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी अ‍ॅड. राघवेंद्र बोधले, उपाध्यक्ष ः अ‍ॅड. शाम जावळे-पाटील, अ‍ॅड. नंदकिशोर मैराण, सचिव अ‍ॅड. प्रमोद वाकुरे, कोषाध्यक्ष अ‍ॅड. विशाल चव्हाण, सहसचिव अ‍ॅड. महावीर गुंड, अ‍ॅड. सिध्देश्वर जमदाडे, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. सारीका मुंडे व राजश्री कोळगे.
 
Top