तेर/ प्रतिनिधी-
टॅक्टरच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तेर ता उस्मानाबाद येथे मंगळवार दिनांक 11 जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तेर शिवारातील मयत व्यक्तीच्या शेतात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील दिलीप विठ्ठल भातभागे ( वय 54 ) यांच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने टॅक्टर मध्ये भरुन दिलेला उपसा खाली करत असताना टॅक्टर क्रमांक MH 25 H 6954 या टॅक्टरचा चालक अंकुश बाबासाहेब चव्हाण रा तेर यांने निष्काळजीपणे व हयगईने पाठीमागे वेगात घेऊन दिलीप विठ्ठल भातभागे यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा र.न 162/19 कलम 269 , 337 , 338 , भादवी 304 ( अ ) प्रमाणे टॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक बी .जी .वेव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सांगळे करीत आहेत