उमरगा/प्रतिधिनी-
 मनाने केलेले कुशल कर्म मानवास विकासाकडे घेऊन जाते तर अकुशल चित्ता तुन केलेली कृती दु:ख निर्माण करते बोधिचित्ताची निर्मिती करण्यासाठी मनातून लोभ, द्वेष, मोहाला बाजूला सारून मनाला विधायक वळण लावल्यास मानव सुखी होतो असे मत धम्मचारी सुचिरत्न (औरंगाबाद) यांनी व्यक्त केले.
उमरगा येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात धम्ममित्रा करिता घेण्यात आलेल्या तीन दिवशीय कार्यशाळेचा शुभारंभ रविवारी त्याच्या हस्ते करण्यात आला मन प्रतिक्रियात्मक सृजक  या बौद्ध धम्मातील शिकवनूकीवर त्यानी ही कार्यशाळा घेतली. या वेळी कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते .विचार पिठावर  त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरचे चेअरमन धम्मचारी ज्ञानपालित, लातूर येथील धम्मचारी कल्याणदस्सी, विरतकुमार, अमरावती केंद्राचे चेअरमन धम्मचारी असंगप्रिय,धम्मचारी प्रज्ञाजित आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पाली पूजेने कार्यशाळेची सुरवात करण्यात आली
पुढे बोलताना सुचिरत्न म्हणाले की आपल्याला मन समजूत घेताना त्याचे दोन भाग होतात एक केवळ मन व दुसरे सापेक्ष मन होय या सकारात्मक आणि नकारात्मक मनाच्या आवस्थेतूनच आपल्याला जावे लागते माणसाच्या वाट्याला कितीही दु:ख आले अथवा आनंद झाला तेव्हा आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावनेला आपण ओळखले पाहिजे आणि ज्ञानप्राप्ती कडे वाटचाल केली पाहिजे धम्मपदाची पहिली गाथा ही मनाच्या शिकवणुकीचा भाग आहे जसे मन असते तसा माणूस घडत असतो त्यामुळे मनाला अधिकाधिक विधायक ठेवण्यासाठी मनावर संस्कार होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत प्रवेश दिला जात नव्हता त्या वेळी वर्गाच्या बाहेर राहीन पण शाळा शिकीन ही जिद्द त्याच्याकडे होती शाळेत बसू दिले जात नाही म्हणून त्यानी शाळा सोडली नाही त्यानी आपल्या मनाला विधायक बनविले तीच शिकवण आपण आपल्या मनावर करावी असे ते म्हणाले
मन प्रतिक्रियात्मक सृजक मनाला अधिक समजून घेण्यासाठी बौद्ध धम्मात प्रतिमा व प्रतीके आली आहेत आपल्या कल्पना शक्तीचा विकास त्यातूनच होत असतो  मनाचे विश्लेषण कस करायचं म्हणून त्याला चित्राच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे . मनाला खऱ्या अर्थाने बुद्धा नि पाहिले आहे मनाचे भाग ओळखले आहेत आपण आपल्या मनाचं अंतर्मुख होऊन पाहणी केली तर आतील द्वद्वव आपणास पहायला मिळेल तोच आपल्या मनाचा आरसा आहे असे ते म्हणाले  कार्यशाळेचे सूत्रसंचालन धम्मचारी ज्ञानपालित यांनी केले या करिता धम्ममित्र तानाजी कांबळे,  राम  कांबळे,राजेंद्र कांबळे,श्याक्यदीप कांबळे आदी  परिश्रम घेत आहेत
 
Top