प्रतिनिधी / उस्मानाबाद
जळकोट येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांना मारहाण करून बळजबरीने लग्न लावून पुणे येथे नेले व अत्याचार केला. तसेच घरात डांबून ठेवले. ही घटना १७ मार्च २०१९ रोजी घडली असून शनिवारी (दि.८)नळदुर्ग पोलिस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. नागनाथ बंडगर व दोन आरोपीत महिला (सर्व रा. जळकोट ता. तुळजापूर) यांनी फिर्यादी महिलेस फोन करून जळकोट येथे बोलावून व त्यांच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह आरोपी अनिल शेषेराव चव्हाण (रा. जळकोट) याच्याशी करून द्या असे म्हणाले. त्यावरून फिर्यादी महिला व तिच्या पतीने नकार दिल्यामुळे रस्त्यात अडवून घरामध्ये बंद केले. तसेच अल्पवयीन मुलीचा विवाह जबरदस्तीने अनिल शेषेराव चव्हाण याच्यासोबत लावून दिले. तसेच अल्पवयीन मुलीस क्रुझर गाडीमध्ये घेवून जाताना पीडित मुलीच्या वडिलांना नागनाथ बंडगर व दोन महिला (सर्व रा. जळकोट), शेषेराव चव्हाण, किरण चव्हाण, अनिल चव्हाण व दोन महिला सर्व (रा. पुणे) यांनी धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने पुणे येथे घेवून गेले. तेथे अनिल चव्हाण याने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. घरात डांबुन ठेवले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला. 
 
 
Top