उस्मानाबाद /प्रतिनिधी-
शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अडीच कोटीचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रयत्नातून हा निधी उस्मानाबाद जिल्ह्यास मंजूर झाल्याची माहिती उस्मानाबाद भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली आहे.
राज्य सरकारच्या महसुल व वन विभागाने दि. ११ जून रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान हा विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांना अडीच कोटी व यवतमाळचे जिल्हाधिकारी यांना अडीच कोटी असा एकुण दोन्ही जिल्ह्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर योजना सन २०१९-२० यावर्षी पुढे चालु ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निधी मंजूर करुन निधी वर्ग केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी व महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर यांचे जिल्हा भाजपाच्यावतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का. सदस्य नितीन काळे, अँड. मिलिंद पाटील, अँड. खंडेराव चौरे, अँड. अनिल काळे, सुधीर पाटील,अँड. व्यंकटराव गुंड यांनी आभार व्यक्त केले आहेत.
