उमरगा /प्रतिनिधी-
रोटरी क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन व उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 7 रोजी पासून आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवस मोफत शस्त्रक्रिया शिबिरात गरीब व गरजू 49 रूग्नावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय, तालुक्यातील ग्रामीण रूग्नालय मुरूम, आलूर, येणेगूर, नाईचाकूर व मुलज या प्राथमिक आरोग्य केंद्रात पंधरा दिवसापूर्वी शस्त्रक्रिया पुर्व तपासणी करण्यात आलेल्या व तपासणीत शस्त्रक्रिया करण्या योग्य असलेल्या महीला, पुरूष व लहान मुले अशा गरजू 49 रूग्नावर उपजिल्हा रुग्णालयात  शुक्रवार दि. 7 पासून ते सोमवार, दि. 10 रोजी पर्यंत नामांकित तज्ञ डॉक्टर कडून हर्निया, अपेंडिक्स, हैड्रोसील, प्लास्टिक सर्जरी अशा वेगवेगळ्या 5 हजार ते 20 हजार रूपये खर्चाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीते साठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पंडित पुरी, वैद्यकीय अधिकारी डॉ विक्रम आळंगेकर, डॉ दीपक पोफळे, सोलापूर येथील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ शरण हिरेमठ, यांच्यासह शल्यचिलित्सक डॉ. लक्ष्मीकांत डिग्गिकर, डॉ शिवशंकर हरळय्या, डॉ बापूराव उपासे, डॉ राजकुमार कानडे, डॉ. उदय मोरे, डॉ मानिषकुमार गोपालप्रसाद, डॉ. अशोक अहंकारी, डॉ. डि. डी. चव्हाण, डॉ. रमेश थोरात, डॉ सिद्राम ख्याडे, भुलतज्ञ डॉ. निलेश महामुनी, डॉ सुनंदा गोरे, डॉ. सचिन सातपुते, डॉ. लता खलंगरे, डॉ. अनुराधा लोहारेकर, डॉ वसंत बाबरे, डॉ. एम. आर. मोमीन, डॉ सी. आर. जाधव, डॉ. कांतीलाल पंडित, परिचारिका सुरेखा जाधव, जयश्री जाधव, अधिपरीचारिका अज्ञान जाधव, सुनीता पवार, मनीषा माळी, कल्पना गावडे, कल्पना चव्हाण, अधिपरिचारक आकाश चव्हाण, कक्षसेवक रमेश येवते, विद्यासागर फुलसुंदर, रवी लोहार, राजीव थोरात, मीरा सातपुते, अश्विनी शिंदे, अश्विनी फंड यांच्यासह रोटरी, इंडियन मेडिकल असोसिएशन पदाधिकारी व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
Top