|
शहरातील पोलिस ठाण्यासमोर असलेल्या भारतीय स्टेट बँकेजवळ एका व्यापाऱ्याच्या अंगावर खाज येण्याची पावडर टाकून चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीवरील ७१ हजार रुप
यांची रोख रक्कम, पासबूक व शेतीची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन पसार झाले. ही घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. संजय बाबूराव स्वामी (रा.डिग्गी) हे व्यापारी वडिलांच्या नावे असलेल्या शेतीकर्जाचा भरणा करण्यासाठी बुधवारी (दि. १९) एसबीआय बँकेतून काढलेले ४५ हजार व गुरुवारी दुपारी बँकेतून काढलेले २६ हजार असे ७१ हजार रुपये भारतीय स्टेट बँकेतुन घेऊन बाहेर येऊन वडील बाबूराव स्वामी येण्याची वाट पाहत बँकेसमोर थांबले होते. दरम्यान, बँकेजवळील झेरॉक्स दुकानासमोर त्यांच्या अंगाला अचानक खाज सुटली यामुळे थोडावेळ गांगरून गेले. यावेळी ते दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून जवळच्या आइसक्रीमच्या दुकानातून पाणी घेण्यासाठी गेले असता चोरट्यांनी दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर असलेली बॅग लंपास केली. या प्रकरणी संजय स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. |