उस्मानाबाद शहरामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २०-२० दिवस नळाला पाणी येत नाही, या अनुशंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात पालिका अपयशी ठरत असल्याने उस्मानाबादकरांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी (दि.२५) उस्मानाबाद पालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उजनी उद्भव योजना पूर्ण क्षमतेने व अखंडीत सुरु ठेवण्यात विद्यमान नगर पालीका प्रशासन पूर्णत: अपयशी ठरत असून पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे उस्मानाबाद शहरवासीयांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. टंचाईच्या पार्श्वभूमीवर बोअरवेल अधिग्रहीत करावीत तसेच चोराखळी धरणातून टँकर सुरू करून जलशुध्दीकरण केंद्रामार्फत शहरात पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. परंतु, केवळ तीन बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आले. यासर्व पार्श्वभूमीवर शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी व सुरळीत पाणीपुरवठ्यसाठी या मोर्चाच आयोजन करण्यात आले आहे. |