लोहारा/प्रतिनिधी-लोहारा शहरातील पत्रकार गिरीश भगत यांना उमरगा येथील समाज विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणारा कै. मधुकर धस स्मृती सामाजिक पत्रकारिता गौरव पुरस्कार यावर्षीचा जाहीर झाला आहे.
उमरगा येथील समाज विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने दरवर्षी कै. मधुकर धस स्मृती सामाजिक पत्रकारिता गौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार दैनिक दिव्यमराठी चे लोहारा तालुका प्रतिनिधी गिरीश प्रकाश भगत यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र, ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप असून उमरगा येथे 15 जून रोजी संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गिरीश भगत यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ, अध्यक्ष प्रल्हाद पांचाळ यांनी दिली आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भगत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.