उस्मानाबाद/प्रतिनिध-महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस-पाटील संघटनेच्या वतीने 30 मे रोजी तुळजापूर येथे पोलिस पाटील प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पोलिस-पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष  हनुमंत देवकते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुळजापूर शहरातील शासकीय रूग्णालयासमोरील होडगी शिवाचार्य स्वामी मठात गुरूवार दि.30 मे रोजी सकाळी 11 वाजता मेळाव्याला सुरूवात होणार आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप घुगे (तुळजापूर), राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलिस-पाटील नरेंद्र ओझा, जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, प्रदेश कार्यकारणी सदस्य दिनकर पाटील, मिडीया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा सचिव धनंजय गुंड, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष हारूण काझी, कार्याध्यक्ष सुनिल पाटील, जिल्हा संघटक प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाकुरे, जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ पाटील, मनिषा जगताप, तालुक्याध्यक्ष ज्योतीराम काटे, मधुकर चव्हाण, सुर्यकांत पाटील, वाघमारे पाटील, नवनाथा साठे-पाटील, हावळे-पाटील, रजेश गायकवाड, माने-पाटील, बसाड-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पोलिस पाटील प्रशिक्षण मेळाव्याला जिल्ह्यातील पोलिस-पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पोलिस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 



 
Top