प्रतिनिधी / उमरगा-
कूपनलिकेचे पाणी विहिरीत किती जमा झाले हे पाहण्यासाठी गेल्यावर विहिरीत तोल गेल्याने पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२५) घडली आहे.
उमरगा तालुक्यातील दावलमालिकवाडी (नळवाडी) येथील शेतकरी धनराज शिवाजी कवठे (३९) स्वतःच्या शेतातील विहिरीत कूपनलिकेचे पाणी किती साठले ते पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी विहिरीत तोल जाऊन पाय घसरला आणि ते विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. मृताचा भाऊ सचिन दुपारचे जेवण घेऊन शेताकडे आला असता त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर येणेगूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलिस कॉन्स्टेबल दिगंबर सूर्यवंशी, निवृत्ती बोळके यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अाकस्मात मृत्यूची नाेंद मुरुम पोलिस ठाण्यात झाली.
 
Top