उस्मानाबाद/प्रतिनिधीभारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्यामार्फत 30  दिवस दि. 08 मे 2019 ते 07 जून 2019 या कालावधीमध्ये " वुमन टेलर प्रशिक्षण"  या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी 18 ते 45 वयोगटातील मुलांनी व महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी
दि. 06 मे 2019 रोजी सकाळी 10.00 वा आपली नाव नोंदणी करावी. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून राहण्याची व जेवणाची सोय विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य्‍ा या तत्वावर फक्त्‍ा 30 प्रशिक्षणार्थींनाच प्रवेश देण्यात येईल  .
या प्रशिक्षण वर्गास प्रवेश मिळण्यासाठी  उमेदवार दारिद्र्य रेषेखालील असावा, बचतगटातील सभासद अथवा  SECC-2011  यादीतील ( कौशल्य पंजी नोंदणीकृत ) सभासद असावा, ही पात्रता असून  प्रवेशासाठी येताना 1) कच्या भिंतीचे, कुडाचे किंवा पत्र्याचे शेड असलेलं घर 2) अत्यंत गरीब कुटुंब (PIP)3) कुटुंबामध्ये कर्ता पुरुष नाही (विधवा प्रमाणपत्र) 4) कुटुंबात कर्ता पुरुष अपंग आहे 5) SC/ST (प्रमाणपत्र) 6) कुटुंबात 25 वर्षापुढील साक्षर व्यक्ती नाही 7) भूमीहीन व मोलमजुरी करणारे व्यक्ती (शेती नसलेले) या सात पैकी एक प्रमाणपत्र सोबत आणावे.
          या प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी  1) शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट (टी .सी.) 2) दारिद्र्य रेषेखालील आसल्याचा दाखला किंवा पात्रतेपैकी किमान एक दाखला. 3) आधार कार्ड/मतदान कार्ड 4) पासपोर्ट साईज 4 फोटो. 5) रहिवाशी प्रमाणपत्र 
6) बॅक पासबूक कॉपी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
          अधिक माहितीसाठी 1) संचालक – श्री. सावंत – 7875443799, 2) श्री. गोफणे – 9763624998, 3) श्रीमती सरपाळे -7030320255, 4) श्री. शेख 9049410000,5) श्री. सुरवसे – 9552858521, 6) श्री.अवधूत पोळ-962379797 यांच्याशी मोबाइलवर किंवा सदन कुकुट पालन ग्राउंड, (पशु वैद्यकीय दवाखाना जवळ )राम नगर, जॉनी हॉटेल शेजारी, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा,असे आवाहन भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक मिलींद सावंत यांनी केले आहे.
 
Top