लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान व खरीप हंगामी शेती शाळा सोयाबीन पिकावर घेण्यात आली. या कार्यक्रमास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला.
यावेळी सोयाबीन पीक शेतीशाळा, माती परिक्षण प्रात्यक्षिक, बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक, रुंद सरी व वरंबा पेरणी पद्धतीचे महत्व, बिजप्रकिया प्रात्यक्षिक, पाण्याचे महत्व व संवरक्षित सिंचनाचा वापर, ऊस क्षेत्र कमी करून हळद , अद्रक असे नगदी पिके घ्यावेत आणि फळबाग क्षेत्र वाढ याबाबत तालुका कृषी अधिकारी एम. बी. बिडबाग यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्व शेतकऱ्यांना देण्यात अली. व सदरील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी एम.बी.बिडबाग यांनी केले. यावेळी आत्मा क्चह्लद्व पवार यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकरी एम.बी.बिडबाग, एन.एम. मगर, व्ही.एस.काळे, जे.के.जाधव, गणेश बिराजदार, एस.एच.पवार, यांच्यासह अधिकारी,कर्मचारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.