परंडा/प्रतिनिधी-
मुंबई येथील नायर हॉस्पीटल मधील भिल्ल आदिवासी समाजाच्या डॉ.पायल तडवी यांच्या मारेक-यांना लवकरात लवकर अटक करुन तात्काळ कठोर शिक्षा करावी यासाठी भारीप बहुजन महासंघ परंडा शाखेच्या वतीने मा. मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांना परंडा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना सदर निवेदनाबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली. निवेदनावर भारीप बहुजन महासंघाचे प्रा.डॉ सुभाष मारकड, रणधीर मिसाळ, नवनाथ कसबे, मधुकर सुरवसे, सचिण पौळ, शहराध्यक्ष दयानंद बनसोडे, प्रा.विलास गायकवाड, दिपक पौळ, स्वप्नील पौळ, सहदेव बगाडे, राहुल अर्जुन बनसोडे, संदिप बनसोडे यांच्या सहया आहेत. यावेळी भारीपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.