प्रतिनिधी/उस्मानाबाद-भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडाळात निवड होणार असल्याने महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोण? अशा प्रकारचा प्रश्न भाजपा पुढे उपस्थित होण्याच्या आगोदरच विद्यमान सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, यांचे नाव पुढे आले आहे. आडवाणी यात्रा असो किंवा गोपीनाथ मुंडेची संघर्ष यात्रा असो किंवा अमित शाहा यांचा परवाचा महाराष्ट्र दौरा असो, याचे सर्व नियोजन आ.सुजितसिंह ठाकूर यांच्याकडेच होते. त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी सुजितसिंह ठाकूर यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आ.सुजितसिंह ठाकूर यांच्यावर नांदेड, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर या चार जिल्हयाची जबाबदारी, होती. या चारही लोकसभा मतदार संघातून आ. सुजितसिंह ठाकूर यांनी अथक परिश्रमाने व योग्य नियोजन करून भाजपा उम्मीदवार निवडुण आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. देशात ज्या-ज्या वेळी भाजपाच्या वतीने मोठया रथयात्रा किंवा संघर्ष यात्रा काढल्या गेल्या त्या-त्या वेळी नियोजनाचे काम आ. सुजितसिंह ठाकूर यांनी अत्यंत चोखपणे बजावले आहे. लालकृष्ण आडवाणी यांची यात्रा असो किंवा गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष यात्रा असो याची जबाबदारी, यशस्वीपणे ठाकूर यांनी संभाळली.मुंडे यांच्या निधनानंतर पंकजाताई मुुडे यांनी महाराष्ट्रभर यात्रा काढली होती. या यात्रेचे ही नियोजन सुजितसिंह ठाकूर यांनी योग्य पध्दतीने हाताळले, अमित शाहाच्या उपस्थितीत मुंबई होणारी भाजपाची चार दिवसाची कार्यशाळा असो किंवा लातुर येथील पक्ष कार्यकर्ता मेळावा आदी सर्व जिम्मेदारी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी यशस्वीरित्या संभाळली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ठाकूर यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी, देणेची शक्यता निर्माण झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासाच्या प्रश्रात स्वत: ठाकूर यांनी लक्ष्य घातले आहे, त्यामुळेच २१ टीएमसी पाणी प्रश्र असो, किंवा सोलापूर, तुलजापूर रेलवे मार्ग असो, या बाबतीत ठाकूर यांनी जातीने लक्ष्य दिल्यामुळे या लोकसभा निवडणुकी मध्ये याचा लाभ उम्मीदवारांना मिळू शकला.