लोहारा/प्रतिनिधी-
प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीतील मातीचे परीक्षण करून घेणे महत्वाचे असून कोणत्या प्रकारची माती आहे, त्यामध्ये कशाचे प्रमाण आहे, याची माहिती घेऊन पिकांचे नियोजन करावे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील वरिष्ठ शेती शास्त्रज्ञ एस. एल सूर्यवंशी यांनी केले.
एकल महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी फिनोलेक्स पाईप्स आणि त्यांचे सी.एस.आर. भागीदार मुकुल फाऊंडेशन व फिक्की फ़्लो पुणे यांच्या मदतीने व पर्याय सामाजिक संस्था हासेगाव के व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हासेगाव (के) येथील पर्याय संस्था कॅम्पस येथे एकदिवसिय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेऴी ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पर्याय संस्थचे संचालक सुभाष तगारे, मुकुल माधव फाउंडेशन चे बबलू मोकळे, मंगेश तळेकर, फिनोलेक्स चे अमोल ठाकरे, श्रीमती अपेक्षा कसबे, विश्वनाथ अण्णा तोडकर, अदि उपस्थित होते. 
या प्रशिक्षणास कळंब आणि वाशी तालुक्यातील ४०० एकल, परितक्ता, विधवा, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला उपस्थित होत्या. एकाच वेळी कॅम्पस परिसरातील दोन वेगवेगळ्या हॉल मध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आले. या वेळी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील शास्त्रज्ञ  शेती तज्ञ् श्रीमती अपेक्षा कसबे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या कि खरीप पिकांचे नियोजन करताना योग्य बियाणांची निवड करावी, बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये, कीड नियंत्रणासाठी काय काय उपाय करावेत याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी पर्याय सामाजिक संस्थेचे विश्वनाथ अण्णा तोडकर यांनीहि महिलांना मार्गदर्शन केले.
 हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प समन्वयक विलास गोडगे, सुनंदा खराटे, भिकाजी जाधव, सुनील कांबळे, असेफ मुलानी, बालाजी शेंडगे, विकास कुदळे, अदिनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Top