प्रतिनिधी/उस्मानाबाद -
उस्मानाबाद नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा रेविता माणिक बनसोडे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे आज शुक्रवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बनसोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी बनसोडे यांच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक माणिक बनसोडे व त्यांचे कुटुंबीय, जेष्ठ नेते जीवन गोरे, सुरेश देशमुख, मल्हार पाटील, पांडुरंग लाटे, पालिकेतील गटनेते युवराज नळे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, शहराध्यक्ष बबलू शेख, नगरसेवक अभय इंगळे, गणेश खोचरे, बाबा मुजावर, प्रदीप घोणे, अभिजित काकडे, प्रा. चंद्रजीत जाधव, प्रदीप मुंडे, बापू पवार, सिधोजी राजेनिंबाळकर, इलियास पिरजादे, लक्ष्मण माने, कुणाल निंबाळकर, प्रल्हाद धत्तुरे, महादेव माळी, दत्ता पेठे, इस्माईल शेख, सनी पवार, संदीप साळुंके, अशोक पेठे, संग्राम बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. 
 
 
Top