काटी / प्रतिनिधी -
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे मंगळवार दि.(21 ) रोजी येथील संत सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठय़ा थाटात पार पडला. तुळजापूर तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या कालचक्रात सापडलेल्या सहा वधु-वरांचे पालकत्व स्विकारुन श्री संत सावता माळी मित्र मंडळाच्या सदस्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे जंगी नियोजन यशस्वीपणे पार पाडुन हजारो लोकांना स्वादिष्ट अन्नदान केले. या सर्वधर्मीय सामुदायिक सहा जोडप्यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर व हजारो लोकांच्या आशिर्वादाची अक्षता डोक्यावर घेत सहा जोडपी एकाच वेळेस विवाहबंधनात गुंफली गेली.
या विवाह सोहळ्या प्रसंगी तुळजापूर तालुक्याचे आमदार श्री मधुकरराव चव्हाण यांनी नवदाम्पत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन शुभआशिर्वाद दिला.
या विवाह सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष जगु माळी यांच्यासह मंडळातील सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. थाटामाटात झालेल्या या या विवाह सोहळ्या प्रसंगी आमदार मधुकरराव चव्हाण,जि. प.सदस्य राजकुमार, पाटील, माजी जि. प. सदस्य संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, काटीचे उपसरपंच सुजित हंगरगेकर, सावरगावचे माजी सरपंच पांडुरंग माळी, मंडळाचे अध्यक्ष जगु माळी, चंद्रकांत माळी, रामेश्वर माळी, परमेश्वर माळी, बालाजी राऊत, सुधीर मगर आदी मान्यवरांसह हजारो वर्हाडी , श्री संत सावता माळी मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने होते.
