काटी/ प्रतिनिधी-
तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील  भवानी ग्राम विकास व शंशोधन संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीस  शुक्रवार  दि. ( 24 )  रोजी राज्याचे सहकार मंत्री  ना श्री सुभाष (बापू) देशमुख  यांनी चारा छावनीला भेट देऊन  शेतकर्‍यांशी संवाद  साधला.  यावेळी शेतकर्‍यांशी संवाद  साधताना   सहकार  मंत्री सुभाष   देशमुख यांनी  शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ निवारण, गावातील पानंद रस्ते या विषयावर चर्चा केली. व चालु सरकार  शेतकर्‍यांच्या पाठीशी  खंबीरपणे  उभे असल्याचे  त्यांनी  यावेळी  स्पष्ट केले.  तसेच भवानी ग्राम विकास व शंशोधन संस्थेचे अध्यक्ष अविनाश कोळी, सचिव आदेश कोळी, मा श्री राजेंद्र मिरगणे, भाजपचे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.  अनिल काळे, सोलापूर  जिल्हा  भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री. शहाजी (भाऊ) पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे,  भाजपा तालुका अध्यक्ष सत्यवान (भाऊ) सुरवसे,  विजय शिंगाडे, प्रदीप सांळुके, जितेंद्र गुंड,  सुहास साळुंके,  अतुल सराफ, काका रोडे, राजु वाडकर, भैरिनाथ काळे, तानाजी चिवरे, हेरार काझी, अमोल कोळी, सुनिल  परिट, दत्ता कोळी, पोपट थिटे, ज्ञानेश्वर गुरव, आदीसह पशुपालक शेतकरी  मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
 
Top