प्रतिनिधी/उस्मानाबाद-
उस्मानाबाद शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी वरिष्ठाच्या त्रासाला आणि स्थानिक पत्रकाराच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मार्च महिन्यात उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्याच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी त्यांचा लैंगिक छळ केला होता. तशी महिला पोलिसाने 28 मार्च रोजी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी याबाबत चौकशीसाठी वरिष्ठांची समिती नेमली होती.
वरिष्ठांकडून लवकर न्याय मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या महिला उपनिरीक्षक गिरी यांनी शुक्रवार दि. ३१ मे २०१९ च्या सकाळी शेरखाने पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या निर्मल अपार्टमेंटच्या चौथ््या मजल्यावरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला आहे.गिरी या खाली पडताच आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पल्स हॉस्पीटीलमध्ये दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच गिरी यांना सोलापूर ला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या त्रासाला आणि स्थानिक पत्रकार याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यांच्या आई-वडिलांनी केला आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आलं आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
चौकशी चे आदेश
महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा गिरी यांनी चौथ््या मजल्यावरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न का केला या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशी नंतर संबंधीतावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधिक्षक आर. राजा यांनी पी.व्ही.लोकराज्यशी बोलताना दिली.