लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरात व तालुक्यातील कानेगाव, जेवळी, अदि गावात  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  शहरातील शिवाजी चौकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई दिपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. व तसेच  शहरातील लोकवाचनालय येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई मुळे, माजी सरपंच नागण्णा वकील, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, माजी सरपंच शंकरअण्णा जट्टे, माजी उपसरपंच व्यंकट घोडके, डॉ.गुणवंत वाघमोडे, भाजप तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर दराडे, माजी पं.स. सदस्य सुधीर घोडके, नगरसेवक श्रीनिवास माळी, जगदिश लांडगे, दिपक मुळे, शिवा स्वामी, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अभिमान खराडे, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, युवक शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक प्रताप घोडके, उमाकांत लांडगे, श्रीकांत कांबळे, बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, जयंती उत्सव समिती अध्यक्ष दगडू तिगाडे, उपाध्यक्ष जयसिंग बंडगर, उपाध्यक्ष गोरख घोडके, सचिव रघुवीर घोडके, सहसचिव प्रेम लांडगे, कोशाध्यक्ष महेश वाघे, कार्याध्यक्ष बलभीम विरोदे, संतोष बंडगर, सहकोषाध्यक्ष   चंद्रकांत शेंडगे, प्रसिद्धी प्रमुख आकाश विरुदे, महेश घोडके, मिरवणूक प्रमुख प्रशांत लांडगे, पांडुरंग घोडके, राजू बंडगर गुणवंत थोरात, काका घोडके, अंकुश बंडगर, नागेश पांढरे विकास घोडके, सूर्यकांत पांढरे, अक्षय वाघे,  महेश घोडके, माणिक तिगाडे, तुकाराम विरुध्दे, भाजप मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, दत्ता स्वामी, विलास बंडगर, अप्पा देवकर, भाजप माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, संजय जेवळीकर, विजय महानुर, मनिषा महानुर, जयश्री लांडगे, अंबादास विरुध्दे, नवाज सय्यद, विवेक बनसोडे, हरीभाऊ क्षिरसागर, राजेंद्र आडसुडे, पंडीत महाराज बनसोडे, प्रशांत आडसुडे, शुभम महानवर लक्ष्मण आडसुडे, सुनिल घोडके, समाधन क्षिरसागर, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top