प्रतिनिधी/उस्मानाबाद  -
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यशवंत प्रतिष्ठिण चे अध्यक्ष दिनेश बंडगर यांनी दिली आहे.
शुक्रवार दि. ३१ मे २०१९ रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने उस्मानाबाद शहरातील आयुर्वैदीक कॉलेज जवळील होळकर चौक येथे प्रा.बालाजी वगरे यांच्या प्रमुंख्ुा उपस्थिती मध्ये प्रतिमा पुजन होणार आहे. तर शहरातील देशपांडे स्टॅड येथे यशवंत प्रतिष्ठाण व अहिल्या सखी मंच च्या वतीने होळकर यांच्या प्रतिमे चे पूजन होणार आहे. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश सोनटक्के, कार्याध्यक्ष सुरेश शिंदे यांच्या उपस्थितीती मध्ये प्रकाश जगताप, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, जिल्हा बैंकेचे संचालक भारत डोलारे, अॅड.खंडेराव चौरे, तानाजी सोनटक्के, अंबादास दानवे, दादा देशमुख, पत्रकार राजाभाऊ वैद्य, बिभिषण लोकरे, आकाश नरूटे, किसनराव मंगरूळे, शिवाजी सोनटक्के, खंडू राऊत, अॅड. अजित कुमार दानवे, निलेश भोसले, नगरसेवक अभय इंगळे, सय्यद खलिल, अग्निवेश शिंदे, अमित उंबरे, गुंडूबाई शेख, दत्ता देवकते आदींच्या उपस्थितीत सायंकाळी भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.
 
Top