संवाददाता । तुलजापूर -
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होताच येथील  भाजयुवा मोर्चा शहाराध्यक्ष प्रसाद पानपुडे यांनी  छञपती शिवाजी महाराज पुतळा ते देवीचरणाी  दंडवत घालून नवसपुर्ती केली.
प्रांरभी छञपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मंहत इच्छागीरी, मंहत दत्तअरण्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दंडवत घालण्यास प्रारंीा झाला. त्यानंतर भवानी रोड राजे शहाजीमहाध्दार मार्गे पानपुडे यांनी दंडवत घालून नवस पुर्ण केला । पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यास देवी चरणी दंडवत घालण्याचा नवास श्री पानपुडे यांनी केला होता. यावेळी तालुका अध्यक्ष सत्यवान सुरवसे, जिल्हा कोक्षाध्यक्ष नागेश नाईक शहर अध्यक्ष सुहास सांळुके, जिल्हा मीडिया उपाध्यक्ष संजय खुरूद, पंकज पाटील, इंद्रजीत सांळुके, सागर कदम, विकास मलबा, दिनेश बागल, सागर इंगळे, नागेश नाईक विकास मलबा आदींची उपस्थिती थी। 
 
Top