उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पोलिस पाटील हा गावातील ग्रामस्थ व पोलिस यांच्यातील दुवा असतो. त्यांनी गावात कायदा व सुव्यवस्था राखीत असताना निःपक्षपातीपणे काम करण्याची गरज असते, असे मत तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी व्यक्त केले.
तुळजापूर येथील होडगी शिवाचार्य मठ सभागृहात गुरूवार दि.30 मे रोजी दुपारी पोलिस पाटील प्रशिक्षण मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाधयक्ष हनुमंत देवकते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिनकर पाटील, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा सचिव धनंजय गुंड, सुर्यकांत पाटील, मधुकर चव्हाण, मनिषा जगताप आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिाती होती. 
पुढे बोलताना पोलिस निरिक्षक ठोंबरे म्हणाले की, गावात घडलेला व घडू पाहणा-या गुन्हांची माहिती पोलिस पाटील यांनी वरिष्ठांना अहवालाद्वारे देण्याची गरज आहे. पोलिस-पाटील शासकीय काम करीत असताना कोणी अडथळा निर्माण केला तर संबंधितांवर 353 कलमाद्वारे कारवाई होऊ शकते. संपूर्ण गावाचे लक्ष पोलिस पाटलांच्या हालचालीवर असते. त्यामुळे त्यांनी चारित्र्यसंपन्न राहून निर्व्यसनी राहण्याची आवश्यकता आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. हारूण पटेल यांनी प्रास्ताविक केले. धनंजय गुंड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. मेळाव्याला जिल्ह्यातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top