प्रतिनिधी/ तेर -
येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख व छावणीचालक सतीशकुमार सोमाणी यांच्या वतीने तेर येथील चारा छावणीत बुधवारी (दि.29) दोन शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींची लग्नगाठ बांधली जाणार आहे.
अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे मुला-मुलींच्या लग्नासह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा तसेच आगामी खरीप हंगामाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकरी वर्गाला भेडसावत आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी वर्गाला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी चारा छावणीत वधू-वराच्या नातेवाईकांनी ठरविलेल्या वेळी दि.29 मे रोजी दुपारी शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहसोहळ्याचे आयोजन केले आहे. दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या भंडारवाडी (ता.उस्मानाबाद) येथील शेतकरी कुटुंबातील या लग्न सोहळ्यात वधू-वरास कपडे, मनी मंगळसूत्रासह संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख तथा छावणीचालक सतीश सोमाणी यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन श्रद्धा बहुउद्देशीय संस्था, आई प्रतिष्ठान तसेच आयोजक सतीश सोमाणी, महादेव खटावकर यांनी केले आहे.