उस्मानाबाद/प्रतिनिधी- बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील दत्तक घेतलेल्या बोरी, कावलदरा व मोर्डा या गावांना दि.19 मे 2019 पासून पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
बोरी येथे ग्रामसेवक सतीश शिंदे, उपसरपंच नितीन हावळे व ग्रामपंचायत सदस्य सचिन हावळे, कावलदरा येथे सरपंच मधुकर राठोड व मोर्डा येथे सरपंच राजेंद्र शेंडगे यांच्या हस्ते या गावांसाठी एस. टी. महामंडळामार्फत पिण्याच्या पाण्याचे टँकरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद विभागाचे विभाग नियंत्रक श्री. रा. य. साळवे, श्री. ह. शं. साळुंके ( यंत्र अभियंता चालन ) ,श्री. अ. अ. जानराव (विभागीय वाहतुक अधिकारी श्री. रा. भ. पवार (बांधकाम अभियंता राजकुमार दिवटे (आगार प्रमुख, तुळजापूर हे उपस्थित होते