प्रतिनिधी/ उस्मानाबाद-
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीच्या अध्यक्षपदी डॉ. संजय सोनटक्के, उपाध्यक्षपदी शिवाजी पसारे, विष्णू चौरे आणि सचिवपदी अॅड. किरण चादरे यांची निवड करण्यात आली आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी आहे. त्यानिमित्त जयंती उत्सावाच्या नियोजनासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. जयंती समितीच्या सहसचिवपदी श्रीशैल बनसोडे, यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी प्रा. कपिल सोनटक्के तर प्रसिद्धी प्रमुख पदी राजाभाऊ वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद शहरातील जत्रा फंक्शन हॉल येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मे रोजी होणाऱ्या जंयतीसाठी व तत्पूर्वी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ही समिती काम पाहणार आहे. यावेळी भारत (अप्पा) डोलारे, दत्ता अप्पा बंडगर, डॉ. गोविंद कोकाटे, अॅड. खंडेराव चौरे,डॉ. संतोष पाटील प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा. मनोज डोलारे, राहुल काकडे, सुभाष सोनटक्के, प्रशांत सोनटक्के, नितीन डुकरे, आशाताई लांडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top