तुळजापूर/प्रतिनिधी-  राजमाता  आहिल्यादेवी होळकर उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती जयंती उत्सव समिती या वतीने खडकी ता. तुळजापूर येथे गुरुवार दि 30 रोजी  राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा वार गुरूवार दि. 30 मे 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
पद्मश्री डॉ विकास महात्मे (राज्यसभा खासदार) यांच्या हस्ते  राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश मिळवणार्या व्यक्तीना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.आज उस्मानाबाद येथे उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती जयंती उत्सव समिती खडकी यांच्या वतीने राम जवान यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नावे जाहीर केले. यामध्ये 
डॉ.राजेन्द्र शेंडगे (जनरल सर्जन उमरगा), रवी घोडके  (पोलिस निरीक्षक सोलापुर शहर), वैजयंती काळे (विभागीय परिसेविका आंबेजोगाई बीड),  मोहन सुर्यवंशी (उद्योगपती पुणे ),  महादेव सोनटक्के (क्रुषी उद्योजक, इटकळ तुळजापुर) अशा या महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या विभागातील 5 व्यकींना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाला उस्मानाबाद व सोलापुर जिल्ह्यातील समाजिक,राजकीय,उद्योग, व्यवसाय,कला,खेळाडु, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहुणे मंडळी तर 2000 हाजार समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती जयंती उत्सव समिती खडकी चे राम जवान यांनी बोलताना सांगितले.
 
Top