उस्मानाबाद/प्रतिनिधी- छत्रपती शिवयरायांच्या विचारांचा वारसा अहिल्यादेविंनी पुढे नेला असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याता चंद्रकांत हजारे यांनी जत्रा फंक्शन हाॅल येथील व्याख्यानमालेत केले. उस्मानाबाद येथील जत्रा फंक्शन हाॅल मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवि होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समीती उस्मानाबादच्या वतीने बुधवार दिनांक 29 रोजी अहिल्यादेवि होळकर यांचा गौरवशाली इतिहास या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अहिल्यादेवींचं जीवन रखरखतं उन होतं त्या उन्हातून वाट काढत त्यांनी रयतेसाठी मायेची सावली धरली म्हणून त्या लोकमाता आहेत. त्यांच्या काळात जलचरांनाही दाणापाणी दिलं जायचं.दुष्काळ पडल्यावर शेतीसिरा माफ केला.
जनावरासाठी चारा पाण्याची व्यवस्था केली.
रयतेला झळ लागू दिली नाही, सार्वजनिक पाणवठे सुरू केले. तलवार न चालवता बुद्धी चातुर्याने युद्ध जिंकले. विधायक कार्य करत असताना राज्याच्या सीमा ओलांडून काम केले असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.सी.सी.बँकेचे संचालक भारत (आप्पा ) डोलारे, डाॅ. गोविंद कोकाटे,अॅड किरण चादरे, मुकुंद घुले, समीतीचे अध्यक्ष संजय सोनटक्के आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोज डोलारे, प्रा. शिवाजी गाढवे, संदिप वाघमोडे,अॅड मनिष वाघमारे, गणेश एडके आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले तर आभारप्रदर्शन डाॅ. संतोष पाटील यांनी केले