उस्मानाबाद/प्रतिनिधी -
शासनाकडून सन २०१७-१८ मध्ये हमीभाव खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तूर व हरभरा ची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित देयके अदा करण्यास आज सुरुवात झाली आहे.
शासनाकडून सन २०१७-१८ मध्ये हमीभाव खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तूर व हरभरा ची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित देयके अदा करण्यास आज सुरुवात झाली आहे.
खरेदी दरम्यान झालेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे मागील वर्षभरापासून ६३ शेतकऱ्यांची तुरीची व २१ शेतकऱ्यांची हरभऱ्याची बिले प्रलंबित होती. सदरील देयके अदा करण्यास नाबार्डने असमर्थता दर्शविल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख व मार्केटिंग फेडरेशन चे कार्यकारी संचालक श्री.योगेश म्हसे, जिल्हा निबंधक श्री. देशमुख, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर आज या प्रयत्नांना यश आले असून शासनाने ४४१ क्विंटल तुरीचे रुपये २४९१६५० व २१ शेतकऱ्यांच्या ३०६ क्विंटल हरभऱ्याचे १३४६४०० अदा करण्यास मार्केटिंग फेडरेशन ने सुरुवात केली आहे. तुरीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून हरभऱ्याचे पैसे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांमार्फत धनादेशाद्वारे अदा करण्यात येणार आहेत. घरातील शेतमाल विकून शेतकरी स्वतःच्याच पैशापासून वंचित होते. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी पैसे मिळण्याची आशा सोडली होती. परंतु आज अखेर त्यांना न्याय मिळवून देण्यात यश आले असून भीषण दुष्काळात हाती पैसे आल्याने शेतकऱ्यांना निश्चितच थोडाफार दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
