प्रतिनिधी / उस्मानाबाद˜-
येथील वीरशैव जंगम मठाच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८८८ व्या जन्मोत्सव सोहळयानिमित्त विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्ज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीचे बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती तमणाप्पा सुरळीकर होते. यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे, नगरसेविका अनिताताई निंबाळकर, जयंती समिती अध्यक्ष नितीन शेरखाने, अॅड. प्रजित जळेगांवकर, ट्रस्टचे कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे उपस्थित होते. प्रास्ताविक वीरशैव जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले यांनी केले. त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बबन वाघमारे यांनी केले. यशस्वीतेसाठी दत्ताभाऊ चव्हाण, परमेश्वर वाले, बाळासाहेब इसाके, आशाताई पाटील, निता गुळवे, शशिकला पाचभाई यांनी पुढाकार घेतला. 
 
Top