उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद च्या वतीने उस्मानाबाद शहरात दुष्काळपरिस्थिती अतिशय गंभीर असून नागरिक विकत पाणी घेऊन ताहन भागवत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुष्काळी परिस्थितीत थोडीशी मदत म्हणून मोफत पाणी टॅंकर चालू करण्यात आले,आज दिनांक १०-५-१९ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेनेच्या वतीने भिषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आसलेले उस्मानाबाद शहरातील नागरिकांना मोफत पाणी टॅंकरने वाटप सुरूवात वडरगल्ली शिवाजी चौक येथून करण्यात आली,यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे,नगरपरिषदचे विरोधी पक्ष नेते युवराज बाप्पा नळे,यांच्या हस्ते पाणी सोडून सुरुवात करण्यात आली यावेळी युवक नेते राजसिंह राजेनिंबाळकर, वोबिसी नेते लक्ष्मण माने,व्यापारी संघाचे मुकेशजी नायगावकर,निलेश भोसले,सरपंच मुरली देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शेटे,शशिकांत कुराडे सलीम आवटी,संजय पवार तन्मय वाघमारे यादी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील प्रत्येक प्रभागात मोफत पाणी वाटप करण्यात येणार आहे*
