लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरात जाणवणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता एक सामाजिक बांधिलकी जपत युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या पुढाकारातुन शिव मित्र मंडळाच्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
या मोफत पाणी पुरवठ्याचा शुभारंभ तहसिलदार विजय अवधाने यांच्या हस्ते करण्यात आला.
      लोहारा शहरात डिसेंबर महीण्यापासुनच कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाई असुन सध्या शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असुन नागरीकांनी घागरभर पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्या सार्वजनिक असो या वैयक्तिक बोअर बंद पडत आहेत. यामुळे पाणीटंचाईची तीव्र अधिक अधिक वाढत चालली आहे. त्यात शहरातील प्रभाग क्रंमाक अकरा व बारा मध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने एक सामाजिक बांधिलकी जपत अमोल बिराजदार या युवकांने पुढाकार घेऊन शिव मित्र मंडळाच्या वतीने टॅकरने मोफत पाणीपुरवठा सुरु केले आहे. यावेळी नायब तहसिलदार रणजित शिराळकर, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, दिपक मुळे, नगरसेवक श्रीनिवास माळी, आयुब अब्दुल शेख, मुक्तार चाऊस, सतिश गिरी, संजय दरेकर, गोरख लोखंडे, शिवमूर्ती मुळे, राजेंद्र गोसावी, किरण पाटील, कमलाकर मुळे, बजरंग माळी, अशोक काटे, राम चपळे,  अशोक क्षीरसागर, किशोर माळी, महेश पाटील, ज्ञानेश्वर माळी, योगेश बिराजदार, सोमनाथ मुळे, विष्णू माळी, विश्वनाथ बिराजदार, महेश बाळू पाटील, हरी चपळे, संजय दरेकर, यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top