उस्मानाबाद/प्रतिनिधी:-
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार दि.12 मे रोजी प्रा.नितीन बानगुडे-पाटील यांचे भव्य व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तुषार आबा निंबाळकर मित्र मंडळाच्या वतीने हे व्याख्यान आयोजित केले आहे.
उस्मानाबाद शहरातील निंबाळकर गल्ली येथे रविवारी सांयकाळी पाच वाजता व्याख्यानाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील शंभू व शिवप्रेमींनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तुषार आबा निंबाळकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
