परंडा /प्रतिनिधी -परंडा शहरातील व्यापारी तथा शिवसेना नेते नागेशआण्णा काशीद यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत दुष्काळा परिस्थिती मुळे हारतुरे टाळून विद्यार्थ्यांना वह्या पेन देवून आनंद उत्सव साजरा केला.व स्वत: च्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळ परिस्थिती मुळे शालेय विद्यार्थ्यांना 21 डझन वह्या व पेन चे वाटप करण्यात आले. याच प्रमाणे ते दरवर्षी आपला वाढदिवस समाजोपयोगी कार्य करून साजरा करतात.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक मेघराज पाटील, नगरसेवक मुसाभाई हन्नुरे, प्राचार्य संतोष भांडवलकर सर,तुकाराम काशीद, संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष समाधान खुळे,सुरेश पंपू काशीद, प्रकाश काशीद, गणेश काशीद, संतोष भालेकर, अनिकेत काशीद,युवासेना उपशहरप्रमुख पांडुरंग आलबत्ते, युवासेना उपशहरप्रमुख कुणाल जाधव, धनाजी काशीद, गणेश आगरकर, अमित ठोंबरे, सुरज काळे, सचिन शिंदे, रामेश्वर सोनमाळी, महादेव गायकवाड, बालाजी गोरे, राठोड सर, लांडगे सर, सुरवसे सर, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.