उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अभिनेता अमिर खानच्या पाणी फाऊंडेशन संचलित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तुगाव (ता.उस्मानाबाद) येथे शुक्रवार दि.१० मे रोजी महाश्रमदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी आ. ओमराजे निंबाळकर, ढोकी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी, गाव कामगार, पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी,खेडच्या ग्रामसेवा संघ पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला.
तुगाव हे तेरणा काठावर वसलेले गाव असून तेरणा मध्यम प्रकल्पासाठी या शिवारातील मोठया प्रमाणावर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. गावचा शिवार काळ्या मातीचा आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमीनीत मुरण्याचे प्रमाण कमी आहे. तुगांव ने यंदा वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. दत्तात्रय हाजगुडे व पोलिस पाटील श्रुतिका हाजगुडे या दाम्पत्याने ट्रेनिंग घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. गेल्या एक महिन्यापासून शिवारात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शाळेतील विद्यार्थी, बचत गटाच्या महिला यामध्ये हिरारीने भाग घेत आहेत. शुक्रवारी महाश्रमदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. माजी आ. ओमराजे निंबाळकर, ढोकी ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमराव वेव्हळ, जिला विशेष शाखेचे नितीन कोतवाड, पोलिस नाईक लोमटे, पोलिस पाटील संघटनेचे जिला मिडीया अध्यक्ष सुभाष कदम-पाटील, स्वामी गवाड, धर्मराज हाजगुडे, सुनिल अंधारे, फकीरनाथ कांबळे, केशव बटणपूरे, तानाजी जाधव, चंद्रकांत बनसोडे, ज्ञानेश्वर पाटील, सरपंच अश्विनी काकडे, सुशिला काकडे, अनिल भुतेकर, मारूती थोडसरे, सुशिल गडकर, भैरू वराळे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
 
Top