तुळजापूर/प्रतिनिधी-
 लग्नसराईच्या पाश्र्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरात नवविवाहीत नवदांम्पत्यांची वावर याञे साठी मोठी गर्दी होत असुन शुक्रवार दि 10 रोजी देविच्या वारा दिवशी सुमारे पाच हजार नवविवाहीत नवदांम्पत्यांनी श्रीतुळजाभवानी मातेचा कुलधर्म कुलाचार करुन वावरयाञा पुर्ण करुन नवर्निवाचीत नव्या वैवाहिक   जीवनास प्रारंभ केला.
हिंदू धर्मीयात लग्न झाल्यानंतर आपआपल्या कुलवैवताची पुजाअर्चा करुन आपल्या नव्या संसार आयुष्य प्रारंभ करण्याची प्रथापरंपरा असुन  त्या पार्श्वभूमीवर सध्या तिर्थक्षेञ तुळजापूरात मोठ्या संख्येने नाविवाहीत येत  आल्या  आपआपल्या पारंपारीक पुजा-या कडे जावून देवीजीस  जोडीने दही दुध पंचामृत अभिषेक पुजा   साडी-चोळी ओटीभरण  नैवध देविदारी जागरण गोंधळ आदिसह अनेक पुजा करीत आहेत. देवधर्म केल्यावर बाजारपेठत येवून देवीच्या मुर्ती फोटो प्रसाद खरेदी करीत असल्याने दुपारनंतर  बाजारपेठ गजबजून जात आहे. नंतर देविला दाखवलेला निवैध प्राशन करून भोजन करुन गावी जात आहेत.
तिर्थक्षेञ रेल्वे मार्गावर नसल्यामुळे भाविक खाजगी वाहनांनी येणे पंसत करीत असल्याने खाजगी वाहनांनी वाहनतळ रस्ते भरुभरुन गेले आहेत. वावरयाञेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह खासकरुन कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, तेलंगणा,  गुजरात येथील नवविवाहीत वावर याञेसाठी  गर्दी करीत आहेत. लग्नतिथी संपे पर्यत नवविवाहीत दाम्पंत्याची गर्दी अशीच राहणार आहे.

 
Top