शेतक-यांना पीकविम्याची रक्कम देण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार शिवसेनेचे संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बँकेच्या या अडवणुकीबद्दल कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हा बँकेने पीकविम्याची रक्कम आठ दिवसांत द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी केली होती. मात्र, बँकेने १६ मेपर्यंत १७७ कोटी रुपयांपेैकी केवळ २४ कोटी रुपयांचे वाटप केले असून, त्यातही १०, २० आणि ५० रुपयांच्या फाटक्या नोटांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येत आहे. रक्कम वाटप करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या पासबुकवर १ हजार रुपये ठेवण्याची सक्ती करण्यात येत असून, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आरटीजीएस करण्याबाबतही नकार देण्यात येत आहे.यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी आदेश देऊनही ढोकी शाखेने त्यांचे आदेश पाळले नाहीत. जिल्हा बँकेच्या या अडवणुकीबद्दल तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना आठ दिवसांत पिकविम्याची पूर्ण रक्कम रोखीने वाटप करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अन्यथा बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल,