प्रतिनिधी/ उस्मानाबाद
पाण्याअभावी फळबागा वाळत चालल्या आहेत. जनावरांना चारा नाही, पाणी, लोकांच्या हाताला काम नाही, चारा छावणीसाठी १० लाख रूपयांचे डिपॉझीट अट अन्यायकार लादली गेली. दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याने लोकांना स्थलांतर करावे लागत आहे, असा गंभीर आरोप  कांग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद व प्रदेश कांग्रेस कमिटी चे सरचिटणीस बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
शुक्रवार दि. १७ मे रोजी दुपारी पुष्पक पार्क येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष धिरज पाटील, विलास औताडे, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चेडे, प्रकाश आष्टे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे,  उपस्थित होते. पुढे बोलताना आ. बसवराज पाटील यांनी सरकार असंवेदनशिल असल्यामुळे कांॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्य पालांची भेट घेतली. सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यास सांगावे अशी विनंती केली. राज्यात दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी सुरू होऊन तीन महिने झाले तरी त्याचे पेंमेट देण्यात आलेली नाही. मागेल त्याला काम व पाणीपुरवठयासाठी टॅंकर दिले जात नाहीत.
कॉंग्रेस च्या कार्यकाळात तहसीलदार स्तरावर टॅंकर व अन्य बाबी देण्याचे अधिकार देण्याचे अधिकार देण्यात आले होते. प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे १ ते २ कोटी रूपये ठेवण्यात आले होते. परंतू या सरकार च्या काळात शेतक-यांना साधा पिक विमा सुध्दा मिळू शकत नाही. दुष्काळग्रस्त भागात तत्काळ उपाययोजना लागू करने आवश्यक असते.परंतू सरकार चे मंत्री दुष्काळाची पहाणी अंधारात लाईट लावून करीत आहे. या सर्व प्रकाणात सरकार गंभीर नाही झाले तर एक आठवडयानंतर कांग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.
यावेळी कांग्रेस चे अग्निवेश शिंदे, राजाभाऊ शेरखाने, बाळासाहेब शिंदे, राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांना निवेदन 
जिल्हयातील कांही भगााचा दौ
रा करून कांग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात बरबाद झालेल्या फळबागेस  नुकसान भरपाई द्यावी, ठिंबक चे अनुदान त्वरीत द्यावे, उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा पुर्ववत सुरू करावा, कृष्णा खो-यातून २१ टिमएसी पाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, खरीप पिकांसाठी बी-बियाणे खते उपलब्ध करून द्यावेत आदी १३ मांगण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

 
Top