उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे.टँकर ची मागणी केली तर सरकारी धोरणामुळे वेळेवर मिळत नाही.अधिग्रहणाचे प्रस्ताव तातडीने मंजूर होत नाहीत.जनावरांना संख्येच्या प्रमाणात छावणी मंजूर केल्या जात नाहीत.लोकांच्या हाताला काम नाही.१,३०००० लोकसंख्येच्या उस्मानाबाद शहरात पाणी असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाणी मिळत नाही.अशा परिस्तिथीत जिल्ह्याचे पालक या नात्याने पालकमंत्र्यांनी आज उस्मानाबाद येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेत उपाययोजना करणेबाबत आदेश देणे क्रमप्राप्त होते.परंतु आज पालकमंत्र्यांनी आपला दौरा अर्धवट सोडला व आचारसंहितेचे कारण पुढे करत निघून गेले.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यात असलेले अधिकारी व कर्मचारी सोडून दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी अटी शिथिल केल्या आहेत एवढी बाब त्यांना ठाऊक नसावी का ? भयानक दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे प्रश्न मार्गी न लावता केवळ दौऱ्याचे सोपस्कार पार पाडण्यासाठी येणाऱ्या पालकमंत्र्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, गटनेते युवराज नळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अयाज {बबलू} शेख, अमित शिंदे, पांडुरंग लाटे सर, नगरसेवक सर्वश्री बाबा मुजावर, अभिजित काकडे, सनी पवार, निलेश पाटील, इस्माईल शेख, दत्ता पेठे, लक्ष्मण माने, चंद्रकांत काकडे, महादेव माळी, अमोल राजेनिंबाळकर, अशोक पेठे, खलील पठाण, राज निकम, नाना घाटगे, इम्तियाज बागवान, एजाज काझी, अमोल सुरवसे, मन्नान काझी, दिनेश बंडगर, बिलाल तांबोळी, रॉबिन बगाडे, रमजान तांबोळी, विलास पवार, पंकज जाधव, जाकेर पठाण, चंद्रशेखर सुरवसे, सय्यद यासेर, आकाश शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
