उमरगा/ प्रतिनिधी-
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शहराच्या वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगत जड वहानांसाठी रस्ता खुला केला असला तरी रस्त्यावरील अनेक अडथळे दुर झाले नसल्याने सुरक्षित प्रवासाची हमी मिळत नाही. वळण रस्त्यावर पावसाला सुरू होण्यापूर्वीच खड्डे पडल्याने निकृष्ट कामाकडे लोकप्रतिनिधी सह सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
उमरगा शहरासाठी सहा किलोमीटर अंतराच्या वळण रस्त्याचे काम तीन वर्षापासुन सुरू असून अद्यापही चौपदरीकरणाचे काम अपूर्णच आहे. त्यात दोन ठिकाणी उच्चदाब वीज वाहिनीचा अडथळा असल्याने संबंधित ठेकेदारा कडून वाहिनीचे काम अजून सुरूच आहे. महिना भरापुर्वी अवजड वहानांसाठी वळण रस्ता सुरू करून दिल्याने शहरात महामार्गावरील वहातूक कोंडीचे प्रकार कमी झाले आहेत. दरम्यान या सहा किलोमीटर अंतराच्या मार्गावर वेगवेगळ्या सहा पुल असून यापैकी दोन पुलाचे काम अजुनही पूर्ण झाले नाही. तर उमरगा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाला तडे जावून भगदाड पडले आहे. कोरेगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजुने भराव टाकून रस्त्याचे काम सुरुच असले तरी रस्त्याच्या चारही बाजुंनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काम होणे अपेक्षित आहे. मुळज व त्रिकोली कडे जाणाऱ्या रस्ता क्रॉसिंग वर सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणे कडून ठोस उपाययोजना नसल्याने वळण रस्त्यावर अपघात होत आहेत. शहराच्या वळण रस्त्यावर दोन ठिकाणी 132 के. व्ही. क्षमतेची उच्च दाबाची वीज वाहिनी गेल्याने मोठ्या वहानांसाठी अडचणीची ठरत आहे. तर उच्चदाब वाहिनीचा अडथळा दुर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्ता क्रक्रॉसिंग करताना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.