प्रतिनिधी/ माधव सूर्यवंशी-
जकेकुर-चौरस्ता ते औश्यापर्यंत 47 किलोमीटर लांब अंतराच्या महामार्गाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाला गतीने सुरुवात झाली असून महामार्गावरी ल पुलाचे कामही सुरू आहे. रस्त्याच्या दबईकरणा चे काम गतीनेेे केले जात आहे. कामाचा दर्जा उत्तम असला तरी पर्यायी रस्त्यावरील खड्डे आणि धूळीचा वहानधारक, प्रवाशांना व वाटसरूना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. साधारणत: 25 किलोमी टर अंतरावरील रस्त्याची खोदाई करण्यात आली असून संबंधित कंपनीकडून काम जलदगतीने सुरू होत असलेतरी खड्डे व धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रवासांनी लातूर जाण्याचा मार्गच बदलला आहे.
राज्य-परराज्यातील वहानांची सातत्याने मोठी वर्दळ असलेला महामार्ग सुरक्षित होण्यासाठी केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्रालयाने उमरगा तालुक्यातील जकेकुर-चौरस्ता ते औश्यापर्यंतचा 47 किलोमीटर लांबीचा महामार्ग सिमेंट रस्त्याने जोडण्याचा निर्णय घेतला असून 47.800 (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 548-बी) किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 223 कोटी 54 लाख खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजूरी दिली आहे. सदर कामाचे कंत्राट पूणे येथील विक्रम इन्फ्रॉस्ट्रॅॅक्चरने घेतले असून कामाची मुदत अठरा महिन्याची आहे. कामपूर्ण झाल्यानंतर चारवर्ष रस्ता दुरुस्तीची तरतूद अंदाजपत्रकात असून काम सुरू होऊन जवळपास पाच महिन्याचा कालावधी होत असून टप्प्या टप्प्याने काम केले जाणार असलेतरी आतापर्यंत रस्त्यावरील पुलाचे व जवळपास आठ किलोमीटर पर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. सदरील महामार्गावरील सिमेंट रस्ता तीस फुट रुंदीचा असणार असून रस्त्याच्या दुतर्फा सर्वि्हसरोड असणार आहे. या मार्गावरील किल्लारी, नारंगवाडी, लामजना, येळवट पाटी, लामजना पाटी या गर्दीच्या ठिकाणवरील सिमेंट रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार आहे. लातूर मार्गावर लामजना पाटीपासुन तेेराशे मीटर अंतरावर टोल नाक्याचे काम करण्याची तरतूद अंदाजपत्रकात आहे. जकेकूर-चौरस्ता ते किल्लारी पर्यंत रस्त्याचे कामसुरु असून कामामुळे बहुतांश ठिकाणी वाहनधारकांना येण्याजाण्यासाठी वळण रस्ता देण्यात आला आहे,मात्र धूळीच्या त्रासा ने वहानचालक व प्रवाशी वैतागले आहेत. तोंडाला रुमाल बांधून दिड तासाचा प्रवास करावा लागतोय. खड्डेे आणि धूळीमुळे जीप,कार,दुचाकी आदी वाहन चालकांनी नारंगवाडीहुन नाईचाकूर मार्गाने माडज, कोरेगावहुन येत आहेेत तर काही बलसूर मार्गे औसा व किल्लारी जात आहेत. बस आणि जड मालवाहू वहानांचा प्रवास धूूूळीतुनच होत असून अनेक वेळा जड वहाने व दुचाकी घसरण्याचे प्रकार होत आहेत. संबंधित कंत्राटदाराकडून सलग रस्ता खोदून ठेवला असल्याने धूळीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी व नियमित पाण्याचा वापर होत नसल्याच्या तक्रारी वाहनधारकांतून होत आहेेेत.
श्वसनाचे आजारात वाढ
सद्यस्थितीत निवडणूकी धुराळा उडाला असून त्यात जकेकूर-चौरस्ता ते औसा या महामार्गाच्या सिमेंट रस्ताचे काम गेल्या पाच महिन्यापासून सुरू आहे. जवळपास 25 किलोमीटर अंतराचा महामार्ग खोदून ठेवल्याने पर्यायी कच्चा रस्ता करून देण्यात आला असलातरी रस्त्यावर सातत्याने पाणी मारण्या त येत नसल्याने भर उन्हाळ्यात अंगाची लाही होत असताना त्यात वाहनांच्या धुराळ्यामुळे समोरून आलेले वाहन दिसून येत नसल्याने किरकोळ अपघात होत आहेत. शिवाय धुराळ्याचे लोट येत असल्याने जड वाहन रस्त्याच्या खाली जाण्याचे प्रकार अधूनमधून घडत आहेत. संबंधित कंत्राटदार यांच्याकडून रस्त्यावर पाणी मारण्यासाठी दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहनांच्या वेगाने धुळीचे कण दुचाकी चालक व नागरिकांच्या डोळ्यात, तोंडात जात असल्याने श्वसनाच्या आजारात बळावण्याची शक्यता वाहनचालक व नागरिक करीत आहेत.
खड्डयामुळे हाडांचे आजार !
महामार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून गेल्या पाच महिन्यापासून 25 किलोमीटर रस्ता खोदून ठेवल्याने पर्यायी रस्ता संबंधित कंत्राटदाराने निर्माण करून दिला असलातरी कच्च्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन व दुचाकीचालक यांना मणक्याच्या आजाराचा भविष्यात त्रास होण्या ची शक्यता दुचाकीचालक व वाहनधारक व्यक्त करीत आहेत.
क्यूरिंगमुळे लागतोय वेळ !
खडकाच्या दबईकरणानंतर बऱ्याच ठिकाणी बेडचे काम झालेले आहे त्यावर मुख्य सिमेंट कॉक्रिटचा रस्ता तयार केला जातोय, सहा ते सात ठिकाणी पुलाचे काम सुरु आहे. या कामाचे क्यूरिंग पेरेड 14 ते 21 दिवस असल्याने वहानासाठी रस्ता खुला करण्यास वेळ लागत आहे. ठिकठिकाणच्या पुलाचे काम अद्याप पूर्ण व्हायचे असल्याने सलगपणे रस्ता खुला करण्यास वेळ लागत आहे. कोरेगाववाडीपाटी ते माडजपर्यंत आठ ते नऊ किलोमीटर अंतरापर्यंत मुख्य सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून साईड सोल्डरचे काम सुरू आहे. या कामाचे क्यूरिंग पेरेड लवकरच संपणार असल्याने आठवडाभरात रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती संबंधित कंपनीकडून सांगण्यात आली. संबंधित कंपनीकडून चांगल्या कामाला प्राधान्य दिले जात असले तरी काम जलदगतीने करून टप्प्याटप्प्याने नवीन रस्ता खुला करण्याची मागणी वाहनधारकां तून केली जात आहे.
 
Top